घरातून वेगळे झाल्यावर देव्हारा कोणाला द्यावा, देवाच्या मूर्तींचे काय करावे.

Advertisement

नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला घराच्या वाटण्या झाल्यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्याचे आणि त्यातल्या देवांचे काय करायचे याची माहिती देणार आहोत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती असली

की लोक आनंदाने एकमेकांसोबत राहतात. एकत्र कुटुंब असेल तर संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाही आणि एकीचे बळ काय असतं हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंब असल्याने भरपूर फायदा आपल्याला होतो. दररोज एकमेकांशी संवाद राहिल्यामुळे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते. कुटुंबातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर कुटुंबातील सगळ्या व्यक्ती त्याची काळजी घेत असतात. परंतु काही कारणामुळे घरामध्ये वाद होऊन घराचे दोन भाग होतात. 

वारंवार होणाऱ्या वादामुळे कुटुंबात फूड पडत जाते पण याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. जर मोठ्या कुटुंबात काही कारणामुळे कुटुंबाचे दोन भाग झाल्यास देवांचे काय करायचे याचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर प्रत्येक कुटुंबाच्या वाटण्या कधी होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण आज काल बऱ्याच कारणांमुळे कुटुंब विभक्त होतात. प्रत्येकाने आनंदाने राहावे अशी इच्छा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते. एकमेकांच्या मतभेदांमुळे किंवा व्यक्तीच्या वादामुळे जर कुटुंबाच्या वाटण्या झाल्या तर देवांचे किंवा देवांच्या मूर्तीचे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. 

कारण कोणत्याही वाटण्या झाल्या तरी चालेल पण देवाच्या वाटण्या कधीच होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. कुटुंबाच्या वाटण्या भावांमध्ये होतात. दोन कुटुंबामध्ये वाटण्या झाल्या की वाड वडिलांचे जे काही देव असतात ते मोठ्या भावाला देण्याची प्रथा असते. काही कारणांमुळे देवाची पूजा करणे शक्य नसेल किंवा मोठा भाऊ नसेल तर देव लहान भावाकडे दिले तरी सुद्धा चालेल. देवांची वाटणी कधीच करू नये वाटणीमध्ये सगळे देव मोठ्या भावाकडे गेले तर लहान भावांनी काय करावं. तर त्यावेळी लहान भावांनी त्यांच्या लग्नात आलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करावी. नंतर जेव्हा लहान भावाच्या मुलाच किंवा मुलीचं लग्न होईल तेव्हा त्यांनी मोठ्या भावाकडे जे टाक आहेत त्या पद्धतीने करून घेतले आणि त्यांची पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल. 

बाकीचे देव कधी वाढवायचे हे सर्वस्व जाणे त्यांनी ठरवायचे असते. आपल्या देवघरांमध्ये कुलदेवतेचे फोटो नक्की ठेवावे पण जेव्हा कधी काही लग्नकार्य वगैरे येतात. आपल्याकडे तेव्हा आपण ते करायचं असतात किंवा मग लग्नकार्य नसेल तर तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचे किंवा कुलदेवी चे फोटो आणू शकता किंवा चांदीचे टाग सुद्धा बनवू शकता. गुढीपाडवा अक्षय तृतीया दिवाळी त्याच बरोबर जे काही सणवार वर्षभर असतात त्यापैकी कोणत्याही एका सणावाराला तुम्ही या देवी देवतांची स्थापना किंवा कुलदेवीच्या टाकांची स्थापना करू शकता. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज आपल्याला नसते. पण शक्य तेव्हा या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या ज्या यात्रा येतात जसे की अक्षय तृतीयेला गुढीपाडव्याला बऱ्याच ठिकाणी यात्रा सुरू असतात. 

चैत्र नवरात्रि मध्ये सुद्धा आपण नवीन टाक आणून आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो. नवीन टाक बनवल्यानंतर आपल्या कुलदेवीला आणि कुलदेवाला जरूर जावे आणि हे टाक सुद्धा देवाला भेटायला जरूर घेऊन जावे. पूजा करण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे ब्राह्म मुहूर्त किंवा सूर्योदय ज्या वेळेला होतो त्यावेळी सुद्धा आपण देवांची पूजा करू शकतो. सकाळी सकाळी शुद्ध वातावरण असतं आणि सर्व ठिकाणी शांतता पसरलेली असते. त्यामुळे देवाची मन लावून मनोभावे आपण पूजा करू शकतो. दररोज आपण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या ताटामध्ये मीठ कधी वाढू नये. त्याबरोबरच देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूण विरहित म्हणजेच कोणत्याही प्रकारचा नैवेद्य आपण देवांना दाखवू नये. आणि तो ग्रहण केलेला आहे अशी कल्पना करावी किंवा मग थेट मी पूर्ण ताट भरून ठेवावं अगदी थोडा वेळ ठेवल्यानंतर तुम्हाला ते खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता.

 आपण दोन प्रकारे नैवेद्य दाखवू शकता. बऱ्याच जणांना वाटतं की प्रवासामध्ये देवाची पूजा कशी करावी किंवा कुठे गावाला गेलो तर देव सोबत घेऊन जावे का तर अजिबात नाही तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहात तोपर्यंत देवपूजा नाही केली तरी चालेल. पण देवांची सतत वाहतुकीवर उठा ठेव आपण करू नये. कारण आपण त्यांची विधीवर स्थापना केलेली असते त्यामुळे तुम्ही प्रवासाला जाऊन कुठेही जा तिथे पूजेसाठी देव नेऊ नका ते तुमच्या देवघरात जिथे तुम्ही राहता तिथेच राहू द्यावे.

धन्यवाद मित्रांनो.

Updated: March 29, 2024 — 10:58 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *