हिंदी चित्रपटाचे जग नेहमीच खूप मोठे राहिले आहे. येथे दरवर्षी काही नक्षत्र जन्माला येतात. सामान्य व्यक्तीपासून स्टार बनवण्याचा प्रवास कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या बालपणापासून सुरू होतो. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल माहिती देणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयपासूनच केली होती. आम्ही फातिमा सना शेख यांच्याबद्दल बोलत आहोत. होय, फातिमाने तिच्या करिअरची सुरुवात लहानपणापासूनच केली होती. चला त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया.
फातिमाचा जन्म ११ जानेवारी १९९१ रोजी हैदराबाद येथे झाला होता. तिच्या वडिलांचे नाव राज तबस्सुम आणि आईचे नाव विपन सहाना आहे. फातिमा यांचे कुटुंब जम्मू-काश्मीरमधील आहे. फातिमाच्या जन्मानंतर तिचे पालक मुंबईत स्थायिक झाले. इथूनच फातिमाने तिचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. मुंबईतील सेंट. झेवियर या हायस्कूलमध्ये तीने शिक्षण घेतले. फातिमाच्या शालेय शिक्षणानंतर ती बर्याच चित्रपटांत दिसू लागली. म्हणूनच ती जगाच्या नजरेत आली.प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर फातिमा यांनी मिठीबाई महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली.
जेव्हा ती ‘चाची ४ २०’ मध्ये बालकलाकार म्हणून भूमिका निभवत होती तेव्हा ती पाच वर्षाची होती आणि आता बावीस वर्षांनंतर फातीमा २८ वर्षाची झाली आणि ती आता खूप हॉ ट आणि सुंदर दिसत आहे. फातिमाने अनेक फिल्ममध्ये कलाकाराच्या भूमिकेत अभिनय केला आहे. परंतु मोठी झाल्यानंतर तिला दंगल गर्ल च्या नावाने ओळखले जाऊ लागले. कारण २०१६ मध्ये रिलीज झालेल्या अमीर खानच्या ‘दंगल’ फिल्म मध्ये फातिमाने गीता फोगाट चा रोल खूप छान निभवला होता.
आणि ही फिल्म सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म सुद्धा आहे. फातिमाने ‘थ ग्स ऑफ हिंदुस्तान’ मध्येही अभिनय केला आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे लाखो फॅन्स फोटोला खूप पसंत करतात. तुम्ही स्वतः पाहू शकतात फातिमा आता किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.