हल्ली बाजारात अनेक प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स आपली तहान भागवण्यासाठी उपलब्ध असतात, पण हे बाजारू ड्रिंक्स थोडयावेळापुरतेच समाधान देतात आणि ते आरोग्यासाठीही योग्य नसतात. घरी बनवलेले डिंक्स तब्येतीसाठी चांगली असतात.थोडीशी मेहनत आणि पूर्वतयारी केल्यास उन्हाळयाच्या काहिलीपासून मुक्ती देणारी ड्रिंक्स घरच्याघरी झटपट बनवता येतात. जर या ड्रिंक्समध्ये काही हर्बल गोष्टी घातल्या तर मग काय बहारच येईल.इथे अशा ७ ड्रिंक्सविषयी चर्चा होणार आहे ज्यांचे जास्तीत जास्त १० मिनिटांत ५ ते ६ ग्लास सहज तयार होतील.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

कलिंगड सरबत : कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी गुणकारी तत्त्व असतात. ही शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्याचे काम करतात. कलिंगडचा रस काढण्याची सोपी पद्धत म्हणजे कलिंगडाचे तुकडे करून एका जारमध्ये ठेवा आणि हलकेच हँड ब्लेंडर फिरवा. मग गाळून घ्या म्हणजे बिया वेगळया होतील. या ज्यूसमध्ये चवीनुसार शुगर सिरप,काळे मीठ, काळीमिरी, पुदिन्याची पाने आणि लिंबू रस टाका. क्रश्ड लेमन आइस सोबत सर्वह करा. कलिंगड ज्यूसचे दालचिनी घालून सरबत बनवा. बिया काढलेले ५०० ग्रॅम कलिंगडाचे तुकडे घेऊन त्यात एक चतुर्थाश चमचा दालचिनी पावडर, चवीनुसार शुगर सिरप, लिंबू रस घालून चर्न करा. क्रश्ड आइस आणि पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.

कुकुंबर मिंट ज्यूस : कुकुंबर मिंट ज्यूस तयार करण्यासाठी २ मध्यम आकाराच्या काकडया सोलून छोटया छोटया क्यूब्समध्ये कापून घ्या. एका मिक्सरच्या जारमध्ये काकडीचे तुकडे, १ लिंबाचा रस, थोडीशी पुदिन्याची पाने,काळे मीठ, साधे मीठ आणि १ मोठा चमचा शुगर सिरप घालून मिक्सरमध्ये घुसळून घ्या. १ कप थंड पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.मग गाळून घेऊन पुदिना क्रश्ड आइस घाला.लिंबाची स्लाइस लावून सव्ह करा.

सातू घातलेले ताक : दह्यात थोडे पाणी घालून घुसळल्यास लस्सी बनते. यात तुम्ही कुठलेही फळ टाकून जसे अंगूरी लस्सी, आंबा लस्सी, संत्रा लस्सी, कलाकंद लस्सी बनवू शकता. जीरे आणि मीठ घालून बनवली तर खारी लस्सी तयार होते. पुदिन्याचे ताक, सातू घातलेले खारे ताक,मसाला ताक इ. बनवता येते. ताक आणि लस्सी दोन्हीही पोटातील जळजळ, अॅसिडिटी दूर करतात आणि यांच्या सेवनाने वजनही वाढत नाही.सातू घातलेले ताक बनवणे खुप सोपे आहे.यासाठी ४ ग्लास थंड ताक घेऊन त्यात ४ चमचे सातू, १ मोठा चमचा शुगर सिरप, २ छोटे चमचे लिंबाचा रस, थोडीशी पुदिन्याची पाने,काळे आणि सफेद मीठ घालून घुसळून घ्यावे. क्रश्ड आइस घालून सव्ह करावे.

कोकोनट कुलर : फ्रेश नारळ मिळाला नाही तर नारळ पाण्याचे कॅनही बाजारात उपलब्ध असतात. या पाण्यात पुदिन्याची पाने,हिरवी मिरची, लेमन, थोडेसे शुगर सिरप, चाट मसाला घालून चर्न करून सर्व्ह करा. चिया सीड्स घालूनही हे तयार करता येते.चिया सीड्स आरोग्यासाठी खूप गुणकारी बनवण्यासाठी १ कप नारळ पाण्यात १ मोठा चमचा चिया सीड्स घालून चमच्याने हलवत राहा. जेणे करून चिया सीड्स फुलल्यावर एकत्र जमा होणार नाहीत. यात लिंबू रस, २ कप नारळ पाणी आणि जलजिरा पावडर घालून लेमन क्यूब्स क्रश करून घाला. थंडगार सर्व्ह करा.

कैरीचे पन्हे : पिकलेले आंबे तर सर्वाना आवडतातच. पण कच्चे आंबे म्हणजे कै्याही काही कमी नसतात. यांपासून फक्त लोणचेच घातले जात नाही तर गरमीपासून संरक्षणही मिळते. कैन्या उकडून सोलून घ्या आणि मग वाटून पाकात घाला. थंड पाणी घालून सव्व्ह करा. याचा जलजिराही फार सुंदर लागतो. जलजिरा बनवण्यासाठी कच्चे किंवा उकडलेले आंबे घेऊन त्यात पुदिन्याची पाने, आले, काळे मीठ, पांढरे मीठ, शुगर सिरप आणि जलजिरा पावडर घालून मिक्सीमध्ये चर्न करा. गाळून क्रश्ड आइस क्यूब्स आणि बुंदी घालून सर्व्ह करा.

टरबूज सरबत : टरबूजामध्ये ९५ टक्के पाणी असते. यात भरपूर प्रमाणात फायबर असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे टरबूजचे सेवन करणे. टरबूज थंड दुधात मिसळून शेक बनवा. यामुळे खूप ताजेतवाने वाटते.टरबूजामध्ये थोडे खस सरबत आणि थोडे दूध घालून चर्न करून घ्या. काही मिनिटांतच उत्तम शेक तयार होतो.

बेल सरबत : बेल एनर्जी बूस्टर आहे.याचे सरबत घरी बनवणे खूप सोपे आहे. याच्या गरातून बिया वेगळया काढून गरात थोड़ी साखर आणि लिंबाचा रस टाकून चर्न करून फ्रीजमध्ये ठेवा. ३-४ दिवस आरामात टिकेल. फक्त थंड पाणी आणि थोडे शुगर सिरप घालून प्या. जवळ जवळ २५० ग्रॅम पिकलेल्या बेलाच्या पल्पमध्ये, ५०० ग्रॅम साखर, १ लहान चमचा लिंबू रस घालून चर्न करून गाळून घ्या. जेव्हा प्यायचे असेल तेव्हा २ भाग बेल घेऊन त्यात २ भाग थंड पाणी मिक्स करून चर्न करून पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here