स्वप्न शास्त्रानुसार स्वप्ने भविष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे संकेत देतात. आपण जे स्वप्न पाहतो त्यांचा काही ना काही काही अर्थ असतो ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्नामध्ये काही वस्तू पहायला मिळणे शुभ मानले जाते. तर काही अशा वस्तू जे स्वप्नामध्ये दिसल्याने अशुभ मानले जाते.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये काही वस्तू पाहायला मिळणे हे धनलाभाचे संकेत असते. असे मानले जाते की जर स्वप्नांमध्ये काही वस्तू दिसल्या तर तुम्ही लवकरच धनवान होण्याची संभावना आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वप्नांमध्ये दिसल्याने धनलाभ होऊ शकतो.
कमळाचे फुल स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये कमळाचे फूल दिसणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार कमळाचे फूल धनाची देवी माता लक्ष्मीला अतिप्रिय असते. म्हणून स्वप्नांमध्ये कमळाचे फूल दिसणे धनप्राप्तीचे संकेत मानले जाते.
फळाने लगडलेली झाड स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये फळाने लगडलेले झाड दिसने खूपच शुभ मानले जाते. फळाने लगडलेले झाड दिसणे म्हणजे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहेत.
पोपट स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये पोपट दिसणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणले जाते की, स्वप्नांमध्ये पोपट दिसण्याचा अर्थ तुम्हाला लवकर कुठून ना कुठून तरी धनलाभ प्राप्त होणार आहे.
मधमाशी स्वप्नामध्ये मधमाशी दिसणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की स्वप्नांमध्ये मधमाशीचा मोहळ दिसण्याचा अर्थ तुम्हाला लवकरच खूप सारे पैसे मिळणार आहे.
हत्ती स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नांमध्ये हत्ती ती पाहायला मिळणे या गोष्टीचा संकेत देतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमांमधून खूप धनलाभ होणार आहे. असे मानले जाते की जर स्वप्नामध्ये हत्ती दिसला तर तुम्हाला लवकरच सन्मान आणि धनाची प्राप्ती होणार आहे.
दूध पिणे स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला दूध पिताना दिसलात तर याचा अर्थ लवकरच तुमचं नशीब चमकणार आहे. असे मानले जाते की स्वप्नामध्ये दूध पिताना दिसणे म्हणजे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धनलाभ होणार आहे.
दात तुटणे स्वप्नामध्ये दात तुटणे सुद्धा शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये स्वतः ब्रश करताना दिसलात तर हेसुद्धा धनलाभ होण्याचे संकेत आहे. असे मानले जाते की तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. आणि तुम्हाला कुठून ना कुठून तरी खूप पैसा मिळेल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.