पण आता उभ रहाययं आहे

वाहून गेला आहे संसार
मोडलं ओहे घरं
पण आता उभं रहायचं आहे.

कुठे तान्हूळ्याला कवटाळून माय निपश्चित पडली,
जिच्या दुधावर आयुष्यभर पोसलो ती गाय वाहून गेली,
होत्याचं नव्हतं सारं झाल आहे….
पणं आता उभं रहायचं आहे.

कुठे शोधायचं घर… कुठे शोधायचं शेत…कुठे शोधायचा देवाळतला देव…
घराच्या भिंती दिसेनाशा झाल्या आहेत…
पण आता उभं रहायचं आहे.

आपल्या माणसांना शोधत आहे नजर…डोळ्यातले अश्रू पार गेले आहेत सुकून… माणसातल्या देवाला पाया पडत पुढे निघायचं आहे…
पण आता उभं रहाययं आहे…

जात पात सर्व गेल आहे वाहून…
मदतीला आले शेकडो हात धावून…
आता त्या हातांचा आधार घेत पुढे सरकायचे आहे…
पण आता उभं रहायच आहे.

माणसातल्या देवांची आता प्रचिती आली… निसर्गापुढे कोणाचे काही चलत नाही… याची पुरेपूर जाणीव झाली…
पण आता उभं रहायच आहे.

रडणार्या लेकरासाठी… नवर्याच्या धिरासाठी… बायकोच्या आधारासाठी… आता कंबर कसायची आहे…अडखळत धडपडतं एक एक पावूल पुढे टाकायचे आहे… नवीन उमेदीने जीवन जगायचे आहे…
पण आता उभं रहायचं आहे.

पण आता उभं रहायचं आहे….

-: “नम्रता वरळीकर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here