गीता बसरा हिने बॉलिवूडमध्ये चांगली सुरुवात केली होती पण लग्नानंतर ति लाईम लाईटपासून दुर राहते गीताचे माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत लग्न झाले असून आता त्यांना एक मुलगी आहे गीताने १३ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करती गीताचा जन्म इंग्लंडच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता गीता तिथेच मोठी झाली आणि नंतर ती भारतात आली गीता बसरा यावेळी तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे.
या निमित्ताने गीता बसराशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या गीता बसरा यांनी लंडनमध्ये ५ वर्षे थिएटर केले आणि त्यानंतर तिने मुंबईतील किशोर नमित अभिनय शाळेत शिक्षण घेतले अभिनय शिकल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी गीता बसरा एक उत्तम मॉडेल होती दिल दिया है या चित्रपटामधून इमरान हाश्मीबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता.
गीता बसराने वर्ष २०१५ मध्ये टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगशी लग्न केले असे म्हटले जाते की या दोघांनी एकमेकांना ३ वर्षांहून अधिक काळ डेट केले होते.लग्नानंतरही गीता चित्रपटसृष्टीत सक्रिय होती आणि द ट्रेन जिल्हा गाझियाबाद सेकंड हँड बॅट्समन सारख्या चित्रपटांमध्ये काम करत होती तिचा नवरा हरभजन सिंगनेही सेकंड हँड बॅट्समन या चित्रपटात एक भूमिका केली होती.
द ट्रेन या चित्रपटात गीताने इमरान हाश्मीसमवेत जोरदार किसिंग सीन आणि बोल्ड पोझ दिले होते तरीही तिचे करिअर योग्य मार्गावर गेले नाही.गीता आणि हरभजन यांना हिनाया नावाची एक सुंदर मुलगी आहे गीता सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. नेहमी मुलीचे फोटो शेअर करत राहते चित्रपटाची पार्श्वभूमी असूनही गीता कधीही तिचा कोणत्याही चित्रपटाबद्दल पती हरभजन सिंगशी चर्चा करत नाही.