सर्वच लिहतात पहिल्या प्रेमावर… पहिल्या ब्रेकप वर… आपण लिहून बघुयात दुसर्या प्रेमावर…

कोण म्हणतं… पुन्हा प्रेम होत नाही… कोणाच्या नजरेला पुन्हा नजर भिडत नाही… आणि ह्रदयाची घंटा पुन्हा वाजत नाही…

कोण म्हणतं… पहिल प्रेम विसरता येत नाही… आणि कुणासाठी आपल ह्रदय पुन्हा धडधडत नाही…

कोण म्हणतं… पहिल्या प्रेमाची नशा काही वेगळीच असते…आणि ते कधी विसरता येत नाही…

ब्रेकप झाल्या नंतर निरस झालेले जिवन कोणाचातरी येण्याने पुन्हा प्रफुल्लित होते… आणि ह्रदयाची सितार पुन्हा वाजु लागते…

पहिल प्रेम हे पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा दरवळणारा सुगंध… तर दुसर प्रेम हे त्या मातीतून फुटणारा नवीन अंकुर…

पहिल प्रेम हे मुसळधार पाऊसाची सर… तर दुसर प्रेम हे त्या नंतर पडलेलं स्वछ ऊन…

प्रेम म्हणजे प्रेम असतं…
तुमच आमचं सेम असतं…
कोणाच पहिल तर कोणाच दुसर असतं… तरी वेगळं मात्र नक्कीच असतं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here