जे लोकं जीवनात कोणत्या गोष्टींना भि तात ते त्या भी तीपासून वाचण्यासाठी अं धश्रध्येचा पाठिंबा घेतात,कारण त्यांना वाटते की असे केल्याने त्यांच्या जीवनातील नकारात्मकता संपून जाईल. ही भीती फक्त सामान्य माणसांनाच नसते तर बॉलीवूड कलाकारांच्या मनात पण काही ना काही भीती असते म्हणून ते पण खूप अंधश्रद्धा बाळगतांना दिसतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो अशे कलाकारांविषयी जे आपल्या जीवनात आणि आपले काम सुरळीत चालण्यासाठी अं धश्रद्धेचा पाठिंबा करतात.
अमिताभ बच्चन – ह्या यादीत सर्वात पहिले बोलू बॉलीवूड चे बादशहा अमिताभ बच्चन विषयी. अमिताभ कार ला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हामेशा कार नंबर मध्ये 2 नंबर नेहमी जोडतात. त्यांच्या प्रत्येक कार मध्ये 2 नंबर नक्कीच असतो.
सलमान खान – बॉलीवूड चे दबंग म्हणजे सलमान खान सुध्दा अं धश्रद्धेचवर बराच विश्वास ठेवतात. खरतर, त्यांच्या हातात एक ब्रेसलेट आहे जे त्यांच्या वडिलांनी त्यांना दिले होते. सलमान शूटिंग दरम्यान ते ब्रेसलेट कधी काढत नाहीत. कारण ते त्यांच्या साठी लकी मानतात.
कॅटरिना कैफ – कॅटरिना कैफ ने अभिनेत्री म्हणून बॉलीवूड मध्ये एक दशक पूर्ण केले आहे. आपल्या अभिनेत्री शिवाय कॅटरिना ची प्रत्येक गोष्टींमध्ये स्तुती करतात. ‘नमस्ते लंडन’ फिल्म च्या प्रमोशन वेळेस कॅटरिना अजमेर शरीफ च्या दर्गा मध्ये गेली होती, जिथे तिच्या कपड्यावरून मोठं मॅटर झालं होतं. परंतु फिल्म ने छान बिजनेस केला होता. तेव्हापासून कॅटरिना आपल्या प्रत्येक फिल्म च्या रिलीज च्या आधी अजमेर शरीफ दर्गा मध्ये प्रार्थना करते.
एकता कपूर – एकता कपूर आपल्या कामाच्या प्रत्येक गोष्टीत ज्योतिष ला जरूर विचारते मगच शुटिंग ची तारीख, शूटिंग ची जागा इतकंच नाही तर बोटात अंगठी बद्दल च का होईना. एकता कपूर हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या हामेशा ठेवते.दीपिका पदुकोण – फिल्म पद्मावती च्या रिलीज पहिले सुद्धा दीपिका सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली होती. दीपिका बाप्पाला खूप मानते म्हणून ती तिच्या प्रत्येक फिल्म च्या रिलीजच्या पाहिले सिद्धिविनायक मध्ये जरूर जाते.