बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही. ती सध्या अभिनयाच्या जगापासून दूर जात आहे. तरीही ती सोशल मीडियामध्ये खूप अॅक्टिव दिसते. ती सोशल मीडियावर काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात.इरा खान सध्या या चित्रपटाच्या चकाचक जगापासून खूप दूर असली तरीही सोशल मीडियावर तीची छायाचित्रे आणि व्हिडिओ बर्याचदा पाहायला मिळतात. येथे ती तिच्या लुक आणि स्टाईलमुळे तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते.
अलीकडेच इरा खानने आपल्या डि प्रेशन बदल धक्कादायक खुलासा केला. अशा परिस्थितीत इरा पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आली आहे. यावेळी इरा तिच्या नवीन प्रेमाविषयी चर्चेत आली आहे. इराच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आलं आहे. इरा खान नुपूर शिक्रेला डेट करत असल्याची बातमी येत आहे. नुपूर शिक्रे हे फिटनेस ट्रेनर आहेत आणि विशेष म्हणजे ते इराचे वडील आमिर खानचा फिटनेस ट्रेनर आहे. बातमीनुसार, दोघेही गेल्या ६ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. इराने घरी असताना आपल्या फिटनेसवर काम करण्याचा विचार केला. नूपुर शिकरे यांच्यासह तिने अनेकदा आपले वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.अलीकडेच इरा खानने टॅटूचा कोर्स पूर्ण केला असून तीने त्याचा पहिला टॅटू नुपूरच्या हातावर बनविला. तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टॅटू काढण्याची छायाचित्रेही शेअर केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, इरा आणि नूपूरचे गंभीर सं बंध आहेत.
अलीकडेच महाबळेश्वरमधील आमिर खानच्या फार्म हाऊसमध्ये कपलने एकत्र सुट्टीचा आनंदही घेतला होता.इतकेच नाही तर दोघेही कोणताही उत्सव किंवा पार्टी एकत्र साजरे करतात. अशीही बातमी येत आहेत की इराने आपल्या आई रीना दत्ताशीही नुपूरची ओळख करून दिली आहे. त्याचवेळी इरा खानने नुपूर शिक्रे यांच्या आईलाही भेट दिली आहे. असे म्हणायचे आहे की, दोघेही आपापल्या नात्यास पुढच्या स्तरावर नेण्याचा पूर्ण विचार करीत आहेत.यापूर्वी इरा खान संगीतकार मिशाल क्रपलानीशी रिलेशनशिपमध्ये होती.
दोघांचे जवळपास एक वर्षाचे अफेयर होते. इराने मिशालबरोबरचे आपले संबंध लपवण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. तीने मिशालबरोबरच्या आपल्या नात्याचा जाहीरपणे उलेख केला. तिने अनेकदा तिचा आणि मिशालचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.मात्र, मिशेल आणि इराच्या नात्यावर वडील आमिर खान खूश नव्हते. आमिर खानचा असा विश्वास होता की इरा खूप लहान आहे आणि तीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वर्ष २०१९ मध्ये, शेवटी इरा आणि मिशालचे ब्रेकअप झाले. तसे, आजकाल इरा नूपुर शिक्रेच्या ना त्यात आल्यामुळे खूप आनंद झाला आहे.