मेष राशी -जुन्या मित्राचा सहयोग मिळू शकतो. एखाद्या कार्यामध्ये उशीर करू नये लवकरच त्याला पूर्ण करावे. हे कार्य तुमच्यासाठी मदत गार सिद्ध होईल. उत्साह वर्धक कालखंड आहे. धनस्थानातील गुरु आवक चांगली ठेवेल. थकबाकी वसूल होईल.
प्रवासाचा आनंद लुटता येईल. रागावर नियंत्रण ठेवा. विध्यार्थ्यांना चित्रकला आदी परीक्षेत प्राविण्यासह यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत अध्यात्मिक समाधान लाभेल.
वृषभ राशी – तुमच्या जीवन साथी ला पूर्ण वेळ द्यावा लागेल. ज्याने तुमच्या मधील मतभेद दूर होईल. चांगले बोलून आपल्यांचे मन जिंकावे लागेल. मंगलकार्यातवे व धार्मिक कार्यात या सप्तहात भाग घ्यावा लागेल. उधारीचे वस्तू अगर उसने पैसे यांची देवाणघेवाण करू नये.
वस्तूची तोडफोड करून ती परत मिळेल तर उसने पैसे एकदा दिलेले परत मिळण्याची शक्यता राहणार नाही. धार्मिक कामासाठी यात्रा घडण्याचा संभव आहे. प्रवास करताना सावधानता बाळगा.
मिथुन राशी – एखाद्या कामाला घेऊन लांबचा प्रवास होण्याचे योग बनत आहे. जवळच्यांच्या सोबत वेळ घालवावा लागेल. कोणासोबतही वाद करू नका.पण चालू काम पहिले पूर्न करा. जुने अडकलेले काम नातेवाईकांमुळे पूर्ण होईल.
नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. स्थलांतर करण्याची वेळ आपणास येईल.नोकरीत पदोन्नती होण्याचे योग आहेत. ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे. त्याने धोका दिल्याने आपणास त्रास होईल. बेरोजगार व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल.
कर्क राशी -ज्या कार्यस्थळावर एखाद्याचा दबाव मेहसुस करू शकता. तुमच्यावर कामाचा बोजा अधिक होऊ शकतो. व्यवसायाची भरभराट होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्यावर विश्वास ठेवताना जरा जपून. नातेवाईकांनी धोका दिल्याने आपणास त्रास होईल.
बेरोजगार व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल. परिश्रम केल्यास नोकरी व मुलाखतीमध्ये यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. विविध योजना आखाल पण त्या पूर्ण होणार नाहीत.
सिंह राशी – तुमचा व्यवहारच तुम्हाला अधिक लाभ देईल. तुमच्या स्वभावाला चांगले ठेवावे लागेल. तुम्ही काही लोकांना आकर्षित करू शकता.मित्राचा सहयोग मिळणार आहे. पण एखादा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.