तो आला की सार विसरुन जायला होत..

कधी कधी बोलण्यातून… तर कधी स्पर्शातुन व्यक्त होतो तो…कधी हळूवार.. कधी तिव्र… तर कधी प्रेमाने…कधी शब्दाने व्यक्त होतो तो…
तो आला की सार विसरुन जायला होत…

मागचा पुठचा विचार न करता… समोरच्याला दुःखावल जात…
समोरच्याला हि मन असत… सार विसरल्या जात…
तो आला की सार विसरुन जायला होत…

कधी दुःखावून… कधी सुखावून जातो तो… लहाना पासून मोठ्या पर्यंत दडून असतो तो… नकळत पटकन बाहेर येतो तो…
तो आला की सार विसरुन जायला होत…

ना वयाच बंधन… न वेळेची मर्यादा त्याला… वेळी अ वेळी येण करतो तो…
तो आला की सार विसरुन जायला होत…

“तो” म्हणजे आपला “राग”…
– नम्रता वरळीकर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here