
मला खुप यातना झाल्या, जेव्हा तो म्हणाला,
” मी प्रेमात पडलोय रे तिच्या…….”
पण त्याच्या अपेक्षेप्रमानेच मी तेव्हा त्याची थट्टा केली.
अन त्याचा चेहरा लगेचच खुलावला,
त्याला काय सांगू काय नको झालेलं,
असं त्याला मी कितेंकदा तरी पहिलेल.
मी म्हणाले, “मज्जा आहे बुवा एका मुलाची!”
तो म्हणाला, ” तुला पण मिळेल रे साथ कुन्या सुंदर मुलाची!”
मन रडत असतानाही हसत होता,
त्याला समजू न देण्याची सगळी काळजी मी घेत होते.
त्याला पण काहीच कळलं नाही,
प्रेमात पडलेल्या त्याला वेगळ काहीच दिसल नाही.
मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची,
कारण तो मला आपली “मैत्रीण” मनायाचा.