अजून पण मला खर वाटत नाही
तो माझ्या सोबत नाही हे मनास
पटत नाही.

काल पर्यंत तो माझ्या सोबत होता
माझ्या अवतीभवती दरवळत
एखाद्या फुललेल्या फुलांप्रमाणे
मनात भिनलेला असाच नकळत.

तो होताच तितकाच सुंदर
अजूनही आहेत कानात त्याचे बोल
त्याची साथ म्हणजे जणू काही इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा अनमोल जणू.

त्याच हसन त्याच जवळ असन
मला हे किती सुखद वाटायच
गोजिरवाणा चेहरा त्याचा
नेहमी हसतमुख असत.

त्याचा श्वास हेच माझे आयुष्य
त्याच्याविना जगन अवघड
सुखाच्या सागरी निजाव त्याने
हिच देवाकडे प्रार्थना करत होते.

पण तो खरच एक फुल होता
फुलाच आयुष्य केवढ
झाडावर जोपर्यंत असत
तुटल कि समपूण जात.

चिमुकल्या हातांनी जन्म भयाच्या
आठवणी देऊन गेला आहे
प्राण माझे हि घेऊन गेला
शरीर फक्त ठेऊन गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here