
शब्दात नाही सांगता येणार
डोळ्यातुन समजुन घेशील का.
सगळे खोटं ठरवील मला
तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना.
चुकते मि असे कधी वाटले
तर हक्काने मला सांगशील ना.
किती ही भांडलो आपण तरी
समोर आल्यावर सगळे विसरुन जाशील ना.
मला तुझी गरज आहे
हे न सांगता ओळखून घेशील ना.
तुझ्यासाठी मी सगळ्यापैकी एक असेल
पण माझ्यासाठी तु एकच अशील ना.