सणासुदीचा काळ सुरु होईल, म्हणून आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगत आहोत, ज्यामुळे साखरयुक्त पेय आणि अधिक कॅलरी असलेल्या मिठाईचे सेवन कमी करता येऊ शकते :आपल्या डाएट प्लानचे पालन करा हेवी ब्रेकफास्ट करा. याने तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील. सणांच्या काळात हेवी ब्रेकफास्ट करा, जो फायबर आणि पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असेल. दुपारच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे. हे पोटाला खूप काळ भरलेले ठेवेल ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाल. आपल्या फ्रिज आणि किचनमध्ये पौष्ट्ीक स्नॅक्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे अनेक प्रकार जास्त प्रमाणात ठेवा.विचार करून खा तुम्ही जे काही खात आहात, त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. यामुळे जर तुम्ही मिठाई किंवा इतर कोणता जास्त कॅलरी असलेला पदार्थ थोडया प्रमाणात खाल्ला तर तुमचा कॅलरी इनटेक वाढणार नाही.

पाणी भरपूर प्या रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास पाणी प्या, याने तुमची पचनसंस्था साफ राहील. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कायम राहील आणि रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल. दिवसातून कमीतकमी ३ लिटर पाणी अवश्य प्या.व्यायाम करायचा नसेल तर डान्स करा जर व्यायाम करणे तुमच्यासाठी कठीण असेल तर मनापासून नृत्य करा. यामुळे खूप प्रमाणात कॅलरीज जळतात. कित्येक प्रकारच्या मिठाई आणि तुपाचे सेवन करूनही स्वस्थ
राहण्याकरिता डान्स हे सगळयात चांगलं वर्कआऊट आहे.आरोग्यासाठी उत्तम उपाय निवडा नेहमी चांगले आणि पौष्टीक पदार्थ निवडा.अतिखाणे टाळा. मिठाईऐवजी सुका मेवा, फळं, फ्लेवर्ड दही यांना प्राधान्य द्या.खरेदीसाठी जा सणांच्या काळात कोणालाही खरेदी करायला आवडते आणि येथे आम्ही तुम्हाला आणखी एक कारण सांगत आहोत की खरेदी करणे तुमच्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते.

आपली शॉपिंगची योजना अशी बनवा की तुम्हाला अधिकाधिक चालावे लागेल. कारचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन शॉपिंग करण्याऐवजी जर तुम्ही बाजार अथवा मॉल फिरून शॉपिंग केली तर जास्त प्रमाणात कॅलरी बर्न कराल. डीटॉक्सिफिकेशन तंत्र तसे पाहता आपल्या शरीराची रचना अशी असते की ते आपोआपच शरीरातील अपायकारक रसायने बाहेर फेकते, तरीही सणांच्या काळात शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. म्हणून आपल्या शरीरातून यांना
काढून टाकायचा प्रयत्न करा. चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी प्या. आपल्या दिवसाची सुरूवात १ ग्लास कोमट पाणी लिंबाचा रस मिसळून घ्या.जर कॅलरी इनटेक जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट किंवा वॉकची वेळ १० मिनिटे वाढवा. सणांमध्येही आपले व्यायामाचे रुटीन चालू ठेवा. बस कार्डिओ थोडे वाढवा.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here