
कधी फक्त एक नाव… तर कधी एक सुखद भावना हा…
कधी अश्रू वाटे मोकळा…. तर कधी खळखळून हसण्यातही हा… तर कधी निशब्द हा…
कधी न बोलता व्यक्त… तर कधी डोळ्यातुन डोकावतो हा…. तर कधी अश्रुंच्या धारेमधून व्यक्त हा…
मात्रुत्वाची पहिली चाहूल… बाळाच्या पहिल्या रडण्यात हा… तर कधी बाबांच्या पहिल्या हाकेत हा…
कधी पहिल्या प्रेमात…कधी मैत्रीच्या ओलाव्यात हा… तर कधी पहिल्या मिठीतून व्यक्त हा…
कधी डोळ्यातुन… तर कधी ह्रदयातून व्यक्त हा… तर कधी सुख दुःखाच्या पाठशिवणीचा नाबाद गडी हा…
अनेक रूप… अनेक रंगातून व्यक्त हा… तर कधी प्रत्येक रंगात वेगळा हा…
“हा” म्हणजे आपला आनंद…
– “नम्रता वरळीकर”