आजकालच्या बहुतांश मातांना मुलांना स्तनपान देणे अत्यंत कठीण काम वाटते. जेव्हा की मुलाच्या जन्मानंतर आईचे दूध मुलांकरिता सर्वात जास्त फायदेशीर असते. आईच्या दुधाने मुलाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे दूध मुलांसाठी अमृतासमान असते.या गोष्टीचे महत्व लक्षात घेत ‘वर्ल्ड फिडींग वीकंच्या निमित्ताने मुंबईच्या ‘वर्ल्ड ऑफ वूमन’ची स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ,सांगतात की स्तनपानविषयी आजही शहरी महिलांमध्ये जागरूकता कमी आहे,जेव्हा की स्तनपान केल्याने ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. ज्या महिलांनी कधी स्तनपान केलेले नसते, त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क जास्त असते.एका अभ्यासात असे आढळले की ज्या महिलांना ब्रेस्ट कैसर मेनोपॉजनंतर झाला आहे.

त्यांनी कधीच स्तनपान केले नव्हते. याउलट ज्या महिलांनी ३० वर्षाच्या आधी स्तनपान केले किंवा ३० वर्ष पार केल्यावर स्तनपान केले आहे अशा महिला ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर आहेत.म्हणून आई झालेल्या प्रत्येक महिलेने स्तनपान अवश्य द्यावे आणि हे समजून घावे की यामुळे मुल सुदृढ़ होते आणि त्यासोबतच आईचे स्वास्थ्य चांगले राहते. स्तनपानाचे खालील फायदे आहेत.हे सर्वात गुणकारी दूध असते. यात असणारे प्रथिनं आणि अमिनो औसिड मुलाच्या वादीसाठी चांगले असते. है मुलाला कुपोषणापासून वाचवते.स्तनातील दूध हे बैंकटेरियामुझ्त आणि ताजे असल्याने मुलासाठी सुरक्षित असते. जेन्हा आई मुलाला दूध पाजतें, मुलाला औटबायोटिक दुधाद्वारे मिळते, ज्यामुळे मुलाचे संसर्गापासून संरक्षण होते.स्तनपानामुळे आई आणि मुलादरम्यान प्रेमाचे नाते वृद्धिंगत होते, ज्यामुळे मुलाला आईच्याबजवळीकतेची जाणीव होते.

मुलाच्या जन्मानंतर आईच्या स्तनातून निघालेल्या पहिल्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. ज्यात औटिबायोटिक्सचे प्रमाण सर्वात जास्त असते, जे मुलांच्या रोगप्रतिकारशक्तिला वाढवते. याशिवाय हे दूध मुलाच्या आतडयांना आणि श्वसन प्रक्रियेला सशक्त बनवते.स्तनांमधील दूध हाडांची वाढ चांगल्याप्रकारे करण्यात व हाडांना मजबूत करण्यात मदत करते.हे दूध ‘सडन इन्फॅन्ट डेथ सिंड्रोम ‘ला कमी करण्यातही मदत करते. जन्मानंतर मुलाची प्रारोंभिक अवस्था खूप नाजूक असते. अशावेळी आईचे दूध सहज पचते, ज्यामुळे त्याला लूज मोशन्सचा त्रास होत नाही.आईसाठीसुद्धा याचे फायदे कमी नाहीत, स्तनपान केल्याने गर्भावस्थेत वाढलेले आईचे वजन हळूहू कमी होते.

एकडेव नाही तर स्तनपानाने महिलेच्या गर्भाशवाचे आर्कुंचन सुरु होते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव चांगल्या प्रमाणात होतो. ज्यामुळे महिलेला ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचा धोका राहत नाही.आईकरिता पोस्टपार्टम डिप्रेशनचा थोका कमी होतो. स्तनपानामुळे स्तनांच्या सौंदर्यात काही फरक पडत नाही, हा निव्वळ एक गैरसमज आहे. जास्त वय झाल्यावर मूल झाल्यास जर महिला योग्य प्रकारे स्तनपान करत असेल तर कॅन्सरशिवाय मधुमेह, लट्ट्पणा आणि अस्थमा यासारख्या आजारांपासून सुद्धा आपोआप दूर राहू शकते.स्तनपान एक वर्षापिक्षा जास्त काळ केल्यास आई आणि मूल दोघही सुदृढ राहतात.जी मुलं सतत ६ महिने स्तनपानावर अवलंबून असतात,त्याची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. आईचे दूध नवजात बालकासाठी सर्वोतम आहे.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here